मन आणि मनाच्या श्रेणी

 

मन आणि मनाच्या श्रेणी

( टिप : माझा ब्लॉग हा पुर्णपणे माझ्या विचारांवर अवलंबून आहे. ते सर्वांना पटलेच पाहिजे यासाठी मी आग्रही नाही. )



मनाचे मुख्यत्वे चार श्रेणी पडतात. पहिली श्रेणी म्हणजे बुद्धी. बुद्धी कायम युक्तिवाद करत असते, प्रत्येक गोष्टी वर उपाय शोधत असते. विज्ञानाने जी काही क्रांती केलीय ती फक्त अनुमानानुसार आणि सध्याच्या युगात अनुमानहेच एक अतिमहत्वाचे मानले जाते. भौतिक गोष्टी बाबतीत आपण अनुमान लावू शकतो पण आपल्या जीवनक्रमाच्या बाबतीत ते तेव्हढं निकाल मिळवून देईल असे वाटत नाही.

बुद्धी असणे हे एक जिवंतपणाचे लक्षण आहे. बुद्धी हे एक अवजार आहे. बुद्धी तेव्हाच काम करते जेव्हा तिच्यासोबत स्मृती असते. समजा, तुमच्या स्मरणात असलेल्या गोष्टी काढून टाकल्या तर तुमची बुद्धी तीची कितीही क्षमता असली तरी काम करू शकणार नाही. तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी स्मृती नसेल तर आपण मुर्ख वाटू शकतो.

शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना एकत्र बसवून एखाद्या गोष्टीची परीक्षा घ्यायची ठरवली तर शहरी विद्यार्थी हुशार वाटतो कारण त्याच्याकडे जास्त माहिती असते आणि सोबतचा ग्रामीण विद्यार्थी कमी हुशार वाटतो. पण, त्या दोघांनाही जर वास्तविक परिस्थिती मध्ये जर ठेवले तर समोर येणार्‍या अडचणींवर ग्रामीण विद्यार्थी सहज मात करताना दिसतो, किम्बहुना तो त्या ठिकाणी हुशार वाटू लागतो. कारण त्याची बुद्धी पुर्ण विकसित झालेली असते. युक्तिवाद तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्याच्याकडे  सगळ्या प्रकारची माहिती असते.

          सध्याच्या युगात युक्तिवादाला खुप महत्त्व दिलं जाते, पण बुद्धीच्या पूर्ण विकासाकडे लक्ष दिले जात नाही.

          मनाची दुसरी श्रेणी आहे अहंकार. अहंकार म्हणजे स्वतःची ओळख. युक्तीवाद एक साधन आहे जे अहंकाराची कायम रक्षा करत असते. समजा, आपली बुद्धी म्हणजे जर धारदार सुरी असेल तर ज्या हाताने त्या सुरीला पकडले आहे तो हात अहंकार झाला. थोडक्यात सुरी वापरुन विनाश कि विकास करायचा हे त्या हातावर अवलंबून आहे ज्याने ती पकडलेली आहे. जर मी स्वतःला भारतीय म्हणत असेन तर भारतीय माझा अहंकार झाला. मग माझी बुद्धी फक्त तो अहंकार सांभाळायचा कायम प्रयत्न करेल. पण सध्या हाताच्या विकासासाठी म्हणजेच अहंकाराच्या विकासासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत. आपण छोटे छोटे अहंकार (ओळख) बनवत चाललोय ज्यामुळे अशांतीच पसरत आहे.

          आधीच्या काळात अह् म ब्रम्हासी’ (म्हणजे मी ब्रम्हांड )अशी ओळख तयार करण्यासाठी प्रयत्नवादी असायचे, आणि त्यानंतरच शिक्षणाला सुरुवात व्ह्यायची. कारण खर्‍या ओळखी शिवाय शिक्षण विनाशकारी बनू शकते. सध्या, अहंकाराचा विकास केल्याशिवाय आपण बुद्धी ला प्रखर बनवतोय आणि स्मृती मुळे ती अधिक शक्तीशाली बनतेय.

          मनाची तिसरी श्रेणी आहे स्मृती. स्मृतीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. जसे कि अचेतन, सचेतन, पंचतत्वाबाबतीत स्मृती, परमाणु, विकास, कर्म, स्पष्ट आठवणी आणि अस्पष्ट आठवणी अश्या सगळ्या अवस्थांचा संग्रह यात असतो.

          चार्ल्स डार्विन ने उत्क्रांतीचा शोध लावला. त्याने जीवसृष्टीच्या उत्पत्ति व विकासाची प्रगती शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवली. पण सुमारे १५००० वर्षांपूर्वी आदियोगी ने योगविज्ञानाच्या साहाय्याने जीवसृष्टीच्या उत्पत्ति व विकासाची प्रगती सांगायचा प्रयत्न केला होता. त्यात १० अवतार त्याने सांगितले होते. पहिला मत्स्य, नंतर उभयचर, स्तनधारी, मनुष्य +जानवर, मनुष्यप्राणी, पुर्ण विकसित मानव (क्रोधी मानव), शांतीपुर्ण मानव, प्रेममय मानव, ध्यानमय मानव आणि दिव्यदर्शी मानव. हे अवतार कोणा एका जिवा चे नसुन या सगळ्या विकासाच्या  अवस्था आहेत.

          योगविज्ञान स्मृतीच्या पुर्ण अवस्थांना सक्रिय करायला मदत करते. थोडक्यात स्मृती एक अद्भुत संभावना आहे. पण स्मृती ला काही मर्यादा असतातच.

          मनाची शेवटची श्रेणी म्हणजे चित्त. चित्त हे स्मृती वर अवलंबून नसते. आणि म्हणुनच तिथे मर्यादा नाहीत. थोडक्यात अ-सीमित बुद्धी म्हणजे चित्त. चित्त या अवस्थेला स्पर्श करणे म्हणजे मनाच्या सगळ्या श्रेणी उलगडल्या सारखे झाले. ज्यालाच आपण देवपण संबधतो.

         

            

 

Comments

  1. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारे चिंतन 👌👍

    ReplyDelete
  2. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.छान विचार

    ReplyDelete
  3. Nice प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे फक्त ते समजण्यास योग्य नजर पाहिजे.

    ReplyDelete
  4. नवी माहीती , नवी संकल्पना ,नव संस्कार
    खूपच सुंदर लेख आहे. धन्यवाद सर.

    ReplyDelete
  5. Its human psychology and its 4 piller...good

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

CONSIDERATION OF GHOSTS

कृष्ण विवरे (Blackholes)

Mystery of Bermuda Triangle