CONSIDERATION OF GHOSTS
शोध भूताचा
‘भूत’ म्हटल्यावर आपल्या सर्वांच्या डोक्यात फक्त एकच विचार येतो, तो म्हणजे ‘अतृप्त आत्म्याचा वावर’! अशी गोष्ट जी
कुणीही पाहू शकत नाही. गम्मतीशीर बाब म्हणजे काही लोकांना
फक्त रात्रीची दिसणारी गोष्ट! थोडक्यात, आत्तापर्यंत ज्या आपण ऐकीव गोष्टी ऐकल्यात त्याचा
अनुभव न घेताच फक्त थोरांचा अपमान नको म्हणून मनामध्ये जे भीतीचे सावट
निर्माण करून ठेवले ते म्हणजे ‘भूत’. मग तो माणूस सुशिक्षित असो किंवा अशिक्षित त्याच्या मनातील
भीती, ‘भूत’ या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवायचा (?) हे ठरवते.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या अशा दोन गोष्टी आहेत, ज्या आपल्याला जगाचा खरा
शोध घेण्यास अडथळा निर्माण करणार्या आहेत. देवावर जो विश्वास ठेवला जातो त्याला श्रद्धा म्हणतात तर भूत ह्या गोष्टीवर विश्वास
ठेवला तर तो अंधविश्वास. पण माझ्यामते अंधश्रद्धा हा देखील श्रद्धेचाच प्रकार.
जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या माणसाला आकलन होत नसते, तेव्हा ती व्यक्ती दुसर्या व्यक्ती ची मदत
घेऊन दुसर्या व्यक्तीच्या विचारांवर स्वत:च्या दृष्टीने पटवून घेऊन विश्वास ठेवते
तिला श्रद्धा म्हणतात आणि त्या विश्वासाला इतर लोक ठरवतात की ती श्रद्धा आहे की
अंधश्रद्धा. थोडक्यात विश्वासाला पारडयात मोजणे म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा.
तसाच एक प्रश्न, ‘भुते असतात का?’ आतापर्यंत याचं प्रमाणशीर आणि मोजमाप करता येईल असे काही
उत्तर सापडलेले नाही. पण विज्ञानाच्या एका दृष्टिकोनातून पाहायचे झाले, तर या
गोष्टीचे एक पूरक उत्तर सापडते.
विज्ञान सांगते की, या जगात न दिसणार्या गोष्टी आपण आपल्या
इतर ज्ञांनेंद्रियांनी अनुभवतो. पण आपल्या ज्ञानेंद्रियांना देखील सीमा आहे.
त्याच्या पलीकडे या जगात असणार्या गोष्टींचा आपण अनुभव घेऊ शकत नाही. पण खूप काही
अज्ञात गोष्टी असू शकतील ही मात्र खात्री आहे. म्हणूनच मानवाने तंत्रज्ञानाच्या
मदतीने खूप गोष्टींचा शोध लावून त्या अनुभवल्या; ज्यात आकाशवाणी, दूरचित्रवाणी, दूरभाष, भ्रमणध्वनी इ. सेवा सहज शक्य झाल्या. हे
शक्य झालेय फक्त 'विद्युतचुंबकीय' लहरींमुळे. ज्यांचा वेग हा ‘30 कोटी मीटर प्रती सेकंद’ इतका आहे. आपण फक्त याच लहरींमुळे आपण जग
पाहू शकतो. या लहरींची तरंगलांबी (wavelength) आणि वारंवारता (frequency) बदलली गेली की त्या लहरींचा
स्वभावधर्म पूर्णत: बदलतो आणि त्याप्रमाणे त्या लहरी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरता
येऊ शकतात. महत्वाची बाब म्हणजे 'visible
band' मध्ये येणार्या लहरी मानव आपल्या डोळ्यांनी
पाहू शकतो. त्याव्यतिरिक्त कुठल्याच लहरी
आपण पाहू शकत नाही. पण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा वापर करून घेऊ
शकतो.
आपण सात रंगांमध्ये (पण
विभिन्नी प्रकारच्या छटांमध्ये) हे जग अनुभवतो. कारण आपल्या डोळ्यांची क्षमता याच
प्रकारच्या लहरी (visible band) पाहू शकते. त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलीच लहर पाहू शकत
नाही. म्हणजे आवाजाची लहर ऐकू शकतो पण पाहू नाही शकत. तसे पाहता आपण जे रंगबेरंगी
जग पाहतोय ते सगळे आभासी आहे. पांढरा प्रकाश म्हणजेच सगळ्या रंगाच्या
प्रकाशकिरणांचा संगम असतो. म्हणजेच इंद्रधनुष्य जे आपण आकाशात बघतो ते पांढर्या
रंगाचा प्रकाश किरण जेव्हा पाण्याच्या थेंबातून जातो (एकाच थेंबात दोनवेळा
परावर्तीत होतो) तेव्हा तो प्रकाशकिरण सात वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागला जातो. समजा
आपण एक भिंत पाहतोय जी लाल रंगाची आहे. त्या
भिंतीवर जेव्हा सर्व प्रकारची प्रकाश किरणे (पांढरा प्रकाश) पडतात तेव्हा फक्त लाल
रंग परावर्तीत होतो आणि बाकीच्या रंगांची प्रकाशकिरणे भिंती मध्ये शोषली जातात. तो
परावर्तीत झालेला रंग आपण त्या भिंतीचा रंग समजतो. मात्र प्रत्यक्षात तसे काही
नसतेच. जर त्याच भिंतीवर आपण हिरवा रंगाचा लेसर किरण टाकला तर मात्र आपल्याला तो
भिंतीवरचा प्रकाश बिन्दु हिरव्या रंगाचाच दिसेल. म्हणजेच हे सगळं प्रकाश किरणांचा
(विद्युतचुंबकीय लहरींचा) खेळ म्हणावं लागेल.
आता ह्या आभासी जगाचा एका दुसर्या उदाहरणाने आपण अंदाज घेऊ. सध्या
प्रत्येकाच्या घरात टेलिव्हिजन संच आहेच आणि आपण रीमोट च्या सहाय्याने सहज चॅनल
बदलतो. पण ज्या लहरीने हे होतेय ती लहर मात्र आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही.
ती जर पाहायची असेल, तर आपल्या स्मार्ट फोनचा कॅमेरा चालू करा आणि TV रीमोट कॅमेरा समोर असा पकडा की
रीमोट च्या दर्शनी भागावर असलेला LED बल्ब तुम्ही तुमच्या कॅमेरातून पाहू शकाल, आता कुठलेही रीमोटचे बटण
दाबा. तुम्हाला तो LED बल्ब प्रकाशित झालेला दिसेल. पण तोच जर तुम्ही नुसता बघण्याचा प्रयत्न करत
असाल तर प्रकाशित दिसत नसतो. आता हे रीमोट सेन्सिंग Infra-Red लहरींमुळे चालते. आणि ह्या लहरी
आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीच. पण
कॅमेरातून जेव्हा ह्या लहरी आपण पाहतो तेव्हा त्या visible होतात.
एखादी भयावह गोष्ट आपणास दिसते
तेव्हा आपण ती डोळसपणे बघितली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मनावर ताबा मिळवून
मनातील भीती दूर केली पाहिजे. तसे पाहता भूत ही गोष्ट शास्त्रीय संशोधनाच्या कक्षेबाहेरील
विषय आहे. जो मनातल्या विचारांशी निगडीत आहे. पण आपण जो विचार करतो ती आपली
कल्पनाशक्ती असते. म्हणूनच सरतेशेवटी मला एक सांगवेसे वाटते की, माणूस जसा विचार करतो तसेच
जग अनुभवतो. माझ्यामते, भूत ही एक कल्पना आहे जिला श्रद्धा आणि विचार खतपाणी
घालतात, जी मुळात अस्तित्वातच नाही. कारण, अस्तित्वात असलेल्या गोष्टी विज्ञानाच्या सहाय्याने स्पष्ट
करता येतात.
--------


Very interesting 🙌👌
ReplyDelete💯
ReplyDeletevery captivating story...and interesting ..
ReplyDeletethank you
DeleteInteresting...
ReplyDeleteचांगला विषय मांडला
ReplyDeletethank you sir
DeleteAbsolutely correct 👍
ReplyDeleteInteresting...
ReplyDeleteThank you all. Please do comment if have any question.
ReplyDeleteOr suggest any topic to write.
Yes, absolutely right, world is all about different energies, this is basic knowledge that everyone should have, if then only we can realise there are few things like gosts are just a part of our imagination, thanks sir for such great information you are giving to us, will help us to aware of exact and real world.
ReplyDeleteInteresting story sir.
ReplyDeleteVery interesting... sir💯
ReplyDeleteखूप छान माहिती दिली सर 👍
ReplyDeleteInteresting..!!
ReplyDeleteNice creation sir 👍👌
ReplyDeleteNice creation sir 👍👌
ReplyDeleteखूप छान सर, अभ्यास आणि निरीक्षण उत्तम👌👌👌👌
ReplyDeleteVery nice story
ReplyDeleteInteresting article Sir!👌
ReplyDeleteNice article..
ReplyDeleteNice article sir
ReplyDeleteअगदी बरोबर मित्रा
ReplyDeleteVery nice topic. It is very interesting topic. Nice sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhup chan aahe sir....read kartana asaa watato tumhi colleg mdhe samor samor amhala he sagla explain kart aahat....
ReplyDeleteInteresting article sir
ReplyDeleteInteresting article sir,àlways had questions about ghost but never thought about this topic from this scientifical perspective
ReplyDeleteसगळ्यांना आवडलं असेल अशी अपेक्षा आहे.
ReplyDeleteकाही मनात प्रश्न असतील तर नक्की कळवा.
When we are alive, we have electrical energy in our bodies. What happens to the electricity that was in our body, causing our heart to beat and making our breathing possible?
ReplyDeleteDr. Albert Einstein proved that all the energy of the universe is constant and it can neither be created nor destroyed.
So what happens to that energy when we die? If it cannot be destroyed, then it must be transformed into another form of energy. What is that new energy?
Could we call that new creation a GHOST?
एखादी वस्तु आपण उंचावरून खाली जमिनीवर टाकली की स्थितीज ऊर्जेचे गतिज, स्थितीज, ध्वनी आदि वेगवेगळ्या रुपात विभाजन होते. तसेच, एखादा जिवंत प्राणी ज्यावेळी मरतो, त्यावेळी त्याच्या शरिरात असलेली ऊर्जा वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर पडते. ते सर्व च उर्जेचे प्रकार आपण पडताळून पाहु शकत नाही. सध्या CCTV cameras सगळीकडे लावलेले दिसतात. हॉस्पिटल मध्ये एखादा मृतदेह ठेवलेला असेल, तर त्या मृतदेहातुन काही तरी (धुक्या सारखी आकृती)बाहेर पडल्यासारखे cctv camera मध्ये सर्रास कैद होते. ते म्हणजे त्या शरीरात असलेली ऊर्जा होय. जी Infra-red मध्ये बाहेर पडते. तशी अजुन खुप प्रकारे बाहेर पडुन शकते. मृतदेह कुजणे हा त्यातलाच एक प्रकार. पण याला भुतं म्हणु शकत नाही.
DeleteThank you sir.
DeleteVery interesting sir..nice topic sir👍
ReplyDeleteVery nice article sir
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteInteresting to knowing about science in such a things...
ReplyDeletevery nice article sir
ReplyDeleteInteresting ...nice sir....👍
ReplyDeleteInteresting ...nice sir....👍
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteinteresting..
ReplyDeleteKharach mast mandani keli aahes mitra
ReplyDeleteBrobr sir
ReplyDeleteGood explained ,sir
ReplyDeleteVery interesting sir. Keep it up.
ReplyDeleteTopic of my interest...great information BHAVESH SIR..so much captivating...
ReplyDelete