Mystery of Bermuda Triangle
बर्मुडा त्रिभुज (त्रिकोण)
बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा, पोर्तोरिको आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडून बनलेला अटलांटिक महासागरातील
त्रिकोण आकाराचा समुद्र प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९,००,००० चौ.किमी आहे.
या त्रिकोणाविषयी अनेक गैरसमज आहेत. कारण या समुद्री प्रदेशात प्रवास करत असताना अनेक जहाजे आणि विमाने आकस्मिकरित्या बुडाली आहेत. म्हणुनच अनेक तर्क वितर्क लावले गेलेत. जसे कि भौतिक शास्त्राच्या नियमाविरुद्ध घटना घडणारा प्रदेश; कृष्णविवरे (black holes) असलेला प्रदेश; अनेक दुर्घटनांना अवकाशातील घटक कारणीभुत असल्याचाही समज आहे.
संशोधनात असं समोर आले आहे की, मुख्य करुन अपघाताचे कारण हे होकायंत्रातील बदल हे होय. { क्षितिज समांतर टांगलेली चुंबकसुची, पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर – द्क्षिण दिशेने स्थिर होते. चुंबकसुची वापरुन दिशा ओळखण्यासाठी बनवलेल्या उपकरणास होकायंत्र म्हणतात.}
या भागात होकायंत्राच्या सुई मध्ये मोठे बदल होत असल्याचं समोर आलं आहे. हे असं स्पष्ट करतं की गुरुत्वाकर्षणातील हा फरक नक्की आहे.
तसे
पहता, या परिसरात मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळं
होत असल्याने विमाने आणि जहाजांना धोका निर्माण होतो. या परिसरात प्रवेश केल्यावर
जहाजांना १०० ते १५० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे व उसळलेल्या लाटांचा सामना
करावा लागतो.
या
परिसरातील ज्वालामुखींमुळे पाण्यात मिथेन हायड्रेट्सचे प्रमाण अधिक असुन, त्यामुळे पाण्याची घनता कमी होते. अशा पाण्यात जहाजांना तरंगत
राहणं कठीण होतं आणि ती बुड्तात.
तसेच
या परिसरामध्ये षटकोनी ढगांची निर्मिती होत असते आणि त्यामुळेच जहाजं आणि विमाने
अदृश्य होत असतात. हे षटकोनी ढग एअर बॉब प्रमाणे काम करतात व त्यातील वार्याचा वेग
सुमारे २७५ किमी प्रतितास असतो. त्यामुळे विमानांना उड्डाणात आणि जहाजांना पुढे सरकण्यात
अडचणी येतात. या ढगांमधे मायक्रोब्रस्ट ही प्रक्रिया होते. त्यातुन ढगांच्या खालच्या
भागातुन हवेचा मोठा झोत बाहेर पडतो व त्यातुन मोठी लाट निर्माण होऊन त्याच्या तडाख्यात
जहाजे सापडतात, तर विमानावर हवेचा झोत पडल्यास
ती कोसळतात.
या परिसरातील
समुद्राची खोली तब्बल ८ हजार ७०० मीटर आहे. समुद्रात एवढ्या खोल जाऊन जहाजांचा शोध
घेणे केवळ अशक्य असतं. त्याच बरोबर षटकोनी ढगांच्या मार्यामुळे कोसळलेली विमाने किंवा
बुडालेली जहाजे जोरदार प्रवाहामुळे लगेचच दूर अंतरापर्यंत वाहून जातात, त्यामुळे त्यांचा शोध घेणे अशक्य होऊन राहतं.
थोडक्यात
एवढचं की, हा परिसर भौगोलिक रचनेमुळे प्रवासासाठी धोकादायक
आहे. या परिसरात भौतिकशास्त्रातील नियमानुसारच घटना घडतात, फक्त
त्यांची व्याप्ती मानवनिर्मित शक्तीच्या आणि कल्पनेच्या पलीकडची आहे.



Nice post 👍..sir different books..and social media ne Bermuda triangle vr yevdhe gairsmj nirman kelet ki science chya dishene kadhi vichar krtach nahi aala..
ReplyDelete👌👌👍
ReplyDeleteOpppppssssss..!! majha javal sudhaa barech gairsamaj hote.. baryaach navin goshtii samajlyaa.. thank u so much.. n really nice work..
ReplyDeleteVery nice 👌👌
ReplyDeleteNice 👌 post... sir👍
ReplyDeleteVery informative post Sir😇...
ReplyDelete👌👌
ReplyDeleteVery nice post sir👍
ReplyDeleteNice article sir 👌👌
ReplyDeletenice article..!
ReplyDeleteVery nice sir 👌
ReplyDeleteBrobr aahe sir. 👍
ReplyDeleteAmazing Information sir
ReplyDeleteVery nice sir👍
ReplyDeleteVery nice sir it's help to reduce misunderstanding about bermuda triangle 👍👍👍👍👌👌
ReplyDeleteIncrease in knowledge ....
ReplyDeleteLogic नुसार विज्ञानाच्या आधारे चांगली माहिती उपलब्ध केली आहे सर👌👍
ReplyDeleteVery good information sir, Thank you.
ReplyDeleteNicely explained..
ReplyDelete