मन , आत्मा आणि शरीर
मन , आत्मा आणि शरीर
( टिप : माझा
ब्लॉग हा पुर्णपणे माझ्या विचारांवर अवलंबून आहे. ते सर्वांना पटलेच पाहिजे यासाठी
मी आग्रही नाही. )
ऊर्जा निर्माण करता येत नाही तसेच ती नष्टही करता येत नाही. ऊर्जेचे
एका गोष्टीतून दुसर्या गोष्टीत रूपांतर होत असते. हे ब्रम्हांड म्हणजे ऊर्जेचे
भांडार आहे आणि आपण त्या ऊर्जेचा एक (अतिसूक्ष्म) भाग आहोत.
पृथ्वी तलावर जन्म घेतल्यावर, आपल्यास भौतिक रुपात
जे प्राप्त झालेले आहे ते म्हणजे आपले शरीर. आणि शरीर म्हटले कि मन आलं. पण आत्मा
म्हणजेच मन का? तर नाही. मन आणि आत्मा या दोन वेगळ्या गोष्टी
आहेत.
ढोबळ शब्दात सांगायचे झालं तर,
मन म्हणजे प्रवृत्ती, आकर्षण, प्रतिकर्षण, चमत्कार, समस्या,
संस्कृती आणि विकृती.
मन, आत्मा,
बुद्धी व शरीर यांचा विचार करता सामान्यत: आपण बुचकळ्यात पडतो,
की ह्या चार गोष्टी नक्की काय आहेत? आपलं
अस्तित्व म्हणजे यापैकी नेमकं काय?
जे काही भौतिक रुपात आहे ते म्हणजे शरीर.
मन म्हणजे प्रवृत्ती, जेथे आकर्षण व प्रतिकर्षण असते, जेथे खुप काही असते
आणि क्षणार्धात सगळं नाश देखील पावतं.
बुद्धी जी जेथे उपाय आणि तर्क (युक्तिवाद) दोन्ही आहेत, जेथे हिशोब मांडला जातो.
आत्मा म्हणजे प्रकाश! जी एक ऊर्जा आहे. आत्मा अस्तित्व आहे.
आणि ते आहे म्हणूनच सगळ्यांना अस्तित्व प्राप्त होते. जसे कि प्रकाश. प्रकाशाचे
अस्तित्व आपण सिद्ध करून दाखवू शकत नाही. पण प्रकाशामुळे खुप गोष्टी दृश्य होतात
आणि त्यांना अस्तित्व प्राप्त होते.
सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न करतो. एखाद्या शरीरात जीव
निर्माण झाला कि त्या शरीराला एक ओळख प्राप्त होते. ते शरीर म्हणजे एक कंपनी समजा.
ज्या कंपनीत ‘मन’ नावाचा व्यवस्थापक असतो. जो पूर्ण शरीर व्यवस्थापित करत असतो (सांभाळत
असतो). आणि त्या कंपनीचा मालक ‘आत्मा’ होय.
आत्मा शरीराचा केंद्रबिंदु असतो. मन शरिराबाहेर पण शरीरासोबत राहून त्याला
सांभाळत असतो. कारण आपण मनाने कोठेही जाऊन येऊ शकतो पण आपण आपल्या शरीराच्या आत डोकावून
पाहू शकत नाही.
थोडक्यात मन हे व्यवस्थापक
(Manager) आहे तर आत्मा मालक (Master)!
जीव (आत्मा) जेव्हा शरीर सोडतो,
तेव्हा ते आपण आत्मा विलीन झाला असे समजतो. पण जे शरीर त्या
आत्म्याने ग्रहण केलेले असते त्यावेळी असलेली मनाची अवस्था (थोडक्यात ‘ कर्म ’ ) त्या जीवाला त्याच्या सवयीप्रमाणे भरकटत
नेण्याचा प्रयत्न करेल. (विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर तो एक ऊर्जेचा गोळा
असतो जो कोणत्याही रुपात असु शकतो. (packet of energy)).
शरीर सोडलेला जीव त्याच्या मनाच्या सवयी प्रमाणे खेचला जाईल. शक्यतो
तो अशा जीवाकडे आकर्षिला जातो जो जिव कमी श्वास घेतो.
थोडक्यात तो भरकटलेला जीव कदाचित चिंचेच्या झाडाकडे आकर्षित होऊ शकतो.
म्हणूनच आपल्याकडे समज आहे कि ‘ चिंचेच्या झाडावर भूते असतात’!
आपण बारकाईने विचार केला तर असे समजेल कि, रात्रीच्या
वेळी शक्यतो पक्षी चिंचेच्या झाडावर बसत नाहीत, कारण
चिंचेच्या झाडाभोवती ऑक्सिजन ची मात्रा खुप कमी असते.
सापांच्या जातींमध्ये नाग याच्यावरही अश्या उर्जेचा परिणाम होऊ शकतो कारण
नाग खुप वेळ श्वास रोखुन धरतो. तसेच योगी माणसांकडे असे जीव आकर्षिले जातात कारण
योगीं चा त्यांच्या श्वासावर एक प्रकारचा अंकुश असतो.
एका ठराविक वेळी जीवाला शरीर सोडावे लागतेच, पण त्याचा एक भाग (ज्याला आपण कर्म म्हणु )
तसाच राहतो. जर हा भाग एका समजदारी च्या उच्च स्तरावर असेल (जागरुक असेल) तर ते
शरीर सोडलेला जीव एक प्रकारच्या सुखामध्ये असेल, यालाच आपण
स्वर्ग संबोधतो. विज्ञानाच्या भाषेत तो एक
असा उर्जेचा गोळा असेल ज्यामुळे सृष्टी मध्ये प्रेरणादायी गोष्ट घडेल किंवा त्या
उर्जेचा त्यासाठी वापर होईल.
या उलट, जो
जीव शरीरातून भितीपोटी, क्रोधामध्ये, अज्ञानामध्ये
शरीर सोडतो, तेव्ह्या कार्मिक शरीर एक प्रकारची अप्रियता
ग्रहण करते. आणि याच अवस्थेला आपण नरक संबोधतो. विज्ञानाच्या भाषेत तो एक असा
उर्जेचा गोळा असेल ज्यामुळे सृष्टी मध्ये विचित्रपणा आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
भौतिक शरीर हा आत्म्या साठी तुरुंग आहे. जोपर्यंत शरीराला
आत्मा तोडू शकत नाही तोपर्यंत तो बाहेर येऊ शकत नाही. जसे आपण शरीरावर कपडे घालतो
आणि काढतो म्हणजे शरीराला काही इजा न होता, अगदी तसेच शरीराला सचेतन रुपात सोडुन जाणे म्हणजे महासमाधी घेणे होय.
मी वरती सांगितल्याप्रमाणे,
श्वास घेणे म्हणजे फक्त ऑक्सिजन आणि कार्बन-डायऑक्साईड या वायुंची
अदलाबदल नाही, तर आपण कसे श्वास घेतो, यावर आपला श्वासावर किती ताबा आहे आणि त्यावरुन
च आपले व्यक्तिमत्व स्पष्ट होते. एकदा स्वत: कडे लक्ष देऊन विचार करा कि, जेव्हा
तुम्ही वेगवेगळे विचार करता तशी तुमची श्वास घेण्याची पद्धत बदलते. आपण रागात ,
दुःखात, सुखात, शांत
असताना वेगवेगळ्या प्रकारे श्वास घेतो. प्रत्येक भावनांच्या पैलू मध्ये श्वास घेण्याची
पद्धत बदलत असते. आपण जसा विचार करतो तसाच श्वास घेतो किंवा जसा श्वास घेतो तसा
विचार करतो. प्राणायाम हे एक विज्ञान आहे जेथे एका विशिष्ट प्रकारे श्वास घेण्यावर
विश्वास ठेवला जातो. ज्यामुळे श्वास घेणे , विचार करणे आणि
जीवनाचा वेगळा अनुभव घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडला जाऊ शकतो.
सरतेशेवटी, हा सगळा
ऊर्जेच्या वेगवेगळ्या रुपांचा खेळ आहे. आपला ऊर्जेकडे पाहण्याचा दृष्टीकोनातून जसा असेल तशी आपल्याला त्याची अनुभती
मिळेल. ऊर्जेचे वेगवेगळे रुपे आहेत, त्या कडे श्रद्धा – अंधश्रद्धा
नजरेतुन न बघता प्रत्येकान डोळसपणे पाहिले
पाहिजे.

nice article 👌
ReplyDelete👍
ReplyDeleteCan we calculate energy of soul
ReplyDeleteIt may be possible Quantum mechanically.
DeleteVery nice article!!
ReplyDeleteNice...!!!
ReplyDeleteDeep one..!
ReplyDeleteNice article, sir!
ReplyDeleteNice article sir..! 👍
ReplyDeleteNice 👌
ReplyDeleteVery nice sir...👌
ReplyDeleteFascinating 🤗
ReplyDeleteSo overall ,
ReplyDelete1. the way you breathe = the way you think
2. मन कुठेही जाऊन येऊ शकेल पण शरीरात डोकावून पाहू शकत नाही . that's a deep topic to discuss 🫨
3. शरीर =company, मन = Manager आणि आत्मा = owner.
The blog was very helpful and informative.
Thank you sir 🙂.