अध्यात्म
अध्यात्म
अध्यात्मिक प्रक्रिया जिवन संदर्भात नसते तर शरीराचा जन्म
आणि मृत्यु संदर्भात असते. म्हणजेच अध्यात्मिक प्रक्रिया आपल्या बाबतीत असते जिथे जन्म व मृत्यू दोन्ही नसतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर
असं म्हणता येईल कि, अध्यात्मिक साधना करुन तुम्ही अशी गोष्ट प्राप्त करु शकता जी मृत्युपश्यात ही
तुमच्याकडुन हिरावुन घेतली जाऊ शकणार नाही.
आपला जन्म या भुतलावर झाला, म्हणजे हे मानवी शरीर आपण ह्या पृथ्वी (धरती माता) कडुन
घेतलेले कर्ज आहे. ज्याची मृत्यु वेळी आपल्याकडुन पुर्ण वसुली करुन घेतली जाते.
परंतु जो पर्यंत आपल्याकडे हे शरीर आहे तोपर्यंत आपण त्यापासुन अशी काही गोष्ट
निर्माण करु शकतो किंवा प्राप्त करु शकतो
जी गोष्ट आपल्याकडुन मृत्युपश्यात कोणीही हिरावुन घेउ शकणार नाही.
तुम्ही प्राणायम करा किंवा ध्यान , ह्या अश्या प्रक्रिया आणि प्रयत्न आहेत कि ज्यामुळे तुमची
जीवन ऊर्जा रुपांतरीत होऊ शकते. म्हणजे जिवन ऊर्जेचे अशा काही सुक्ष्म तत्वांमध्ये
रुपांतरण होईल जे टिकाऊ असेल. जे कोणीही हिरावुन घेऊ शकणार नाही. मृत्युपश्यातही
आत्मा सोबत असेल. सोप्याभाषेत बोलायचे झाले तर, आपण या सुक्ष्म तत्वांना मिळवण्याचा प्रयत्न नाही केला तर मृत्यु
वेळी आपल्याकडुन सर्व काही हिसकावुन घेण्यात येईल, आणि पुढिल आत्म्याच्या प्रवासात या मानवी जन्मात मिळवलेले
असे काहीही सोबत नसेल म्हणुन पुढचा प्रवास खडतर होऊ शकतो.
हे मानवी शरीर हा एक पृथ्वीचा भाग आहे. म्हणुनच अध्यात्मिक व्यक्ति
(योगी) नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत करतात, जमिनीवर बसतात, अनवाणी फिरतात, जेणेकरुन मानवी शरीरास ते पृथ्वीचाच एक भाग आहे याची सतत जाणिव करुन देत असतात.
मानवी शरीरास घमेंड निर्माण न होता त्यास सतत ते नश्वर असल्याची जाणिव झाली
पाहिजे.
आपले शरीर पंचमहाभुतांनी बनलयं असे म्हणतात आणि ते खरे आहे हे
आपणांस जाणवते देखील. ती पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, पाणी, तेज, वायु आणि
आकाश. याच पंचमहाभूतांपासुन आपल्या शरीरातील त्रिदोष (कफ, पित्त व वात) बनलेले आहेत. [ पृथ्वी + पाणी = कफ , तेज = पित्त, वायु + आकाश = वात ]. म्हणुनच, माणुस मरण पावल्यावर तो पंचतत्त्वात विलिन झाला असे म्हणतात.
सध्याच्या आपल्या जिवन शैली मध्ये, निदान दिवसातुन एक तास तरी मातीमध्ये काम करणे, बाग काम करणे किंवा काही वेळ अनवणी फ़िरलो
तरी आपल्या शरीरास याची नेहमी जाणिव राहिल कि आपले शरीर हे नश्वर आहे. थोडक्यात
सांगायचे झाले तर, जेवढी लवकर आपल्या शरीरास जाणिव होईल कि ते नश्वर आहे तेवढे लवकर तुम्ही
अध्यात्मिक बनाल.
मनात असलेले सर्व भ्रम, आशा, कल्पना निघून जाऊन वास्तविकतेचा स्वीकार करणे म्हणजे अध्यात्मिक होणे. कारण वास्तविकता म्हणजे सत्य! सत्य म्हणजे अस्तित्व. आपण मनामध्ये देव किंवा दानव यांची कल्पना करतो आणि तसे अनुभवतो सुद्धा. खरे पाहता देव आणि दानव दोघांनाही महत्त्व नाही. कारण जी काही आपण कल्पना करतो ती आपल्या संस्कृती वर आणि ज्या गोष्टींचा आपल्यास अनुभव आलाय त्यावर अवलंबून असते. वास्तविकता म्हणजे वर्तमान. आता आपण आहोत ही वास्तविकता, जिथे आपल्याला माहिती देखिल नसते कि आपण कोणत्या ठिकाणावरुन आलोय आणि कोठे जाणार. हिच जिवनाची वास्तविकता आहे.
तसे पाहता
आपल्यास आपल्या सर्व धर्माकडून आशावादी बनवले जाते. म्हणजे वास्तव आणि सत्य यापासून
दूर केले जातं. म्हणूनच अध्यात्म म्हणजे काय याची जाणीव व्हायला खुप वेळ जातो. जर प्रत्येक
धर्माने व्यवस्थित अध्यात्म्याची जाणीव करून दिली तर प्रत्येक व्यक्तिचा सर्वांगीण
(फक्त भौतिक नाही) विकास झाला असता.
आशा
रहीत आनंदी जीवन जगणे म्हणजे अध्यात्मिक होणे.

थोडक्यात पण महत्वाचा असा विचार करायला लावणारा लेख आहे, खर अध्यात्म म्हणजे नक्की काय हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.
ReplyDeleteThank you sir for this wonderful information .....
ReplyDeleteअध्यात्म जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर भागवतगिता आपल्या आचरणात आणायला हवी.
हा लेख वाचून अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
ReplyDeleteतेज म्हणजे काय?
अध्यात्मा मध्ये तेज म्हणजे प्रकाशाचे अग्नी रुप होय. एखाद्या माणसाचा चेहरयावर तेज दिसते ते म्हणजे प्रकशाची (उर्जा) अनुभुती असते जी त्या माणसाकडून बाहेर पडत असते.
DeleteThanks
DeleteThank you for your comments
ReplyDeleteआपले काही प्रश्न, मते असतील तर नक्की लिहा.
ReplyDeleteEnlightening article..!
ReplyDeleteReally great thoughts 🙌
ReplyDeleteNice post 👍..कल्पना निघून जाणे म्हणजे..नेमक कशा related?
ReplyDeleteआपण लहानपणापासून कल्पना करतच जगत असतो, ती पुढील आयुष्याची कल्पना करणेच सोडून देऊन आहे ते वास्तविक स्विकार करणे
DeleteThank you 👍☺️
Deleteखूप सुंदर लेख लिहिला आहे!!
ReplyDeleteGreat 👍
👍👍
ReplyDeleteYou have been always delivering such wonderful thoughts.
ReplyDeleteIt is becoming very important to learn such things for our generation, thank you for explaining in easy way.
Blessed to have you as a guide🤗
सर्व धर्म मानवाला अंतिम सत्याकडे नेण्याचाच प्रयत्न करतात. चूक धर्मांची नसून धर्माच्या शिकवणीचा अर्थ लावण्यामध्ये होत आहे.
ReplyDeleteअध्यात्मिक जिवन म्हणजे नेमकं काय या बद्दल मनात नेहमी प्रश्न असायचा पण कधी या दृष्टीने विचार नाही केला.
ReplyDeleteThank you very much for this wonderful article..
Nice content 👌
ReplyDeleteVery nice content sir .. Feeling nice after reading this morning..We need to think upon our lifestyle again ...its true ...,👍
ReplyDeletePartly agree
ReplyDeleteIt's very nice sir ....it gives clear cut way to understand.
ReplyDeleteअप्रतिम लेख... 👍
ReplyDelete👍🏻👍🏻
ReplyDeleteकुंडलिनी हा काय प्रकार आहे.?
ReplyDelete७ चक्रे असतात त्यांनाच कुंडलिनि म्हणतात. अध्यात्म वापरुन ती जाग्रुत करता येतात. खुप मोठा विषय आहे हा.
Delete😇Religion is for people who're afraid of going to hell. Spirituality is for those who've already been there''☺️
ReplyDelete