Today's Pandemic Situation and Students Career

 कोरोनाचा काळ आणि मुलांचे करीयर


नमस्कार मित्रहो,

सध्या कोरोना सारख्या रोगाची साथ सुरु असताना, आपण स्वतःची तसेच घरातल्यांची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. सरकार आपल्यापरीने, ही साथ रोखण्यासाठी वैद्यकिय सेवे सोबत संचारबंदी, जमावबंदी आदि कायद्याने जमतील तसे सर्व प्रयत्न करत आहेच.

या कोरोना महामारीणे खुप काही आपल्याला शिकवले. पर्यावरणाच्या द्रुष्टीने बघायचे झाले तर, वातावरणात प्रदुषण कमी होवु लागलय. निसर्ग पुन्हा बहरताना दिसतोय .

     माणसाचा गेलेला प्राण वगळता, आपण सर्व काही पुन्हा मिळवू शकतो. तरी देखील एक असे महत्त्वाचे क्षेत्र आहे ज्यामुळे समाजाचे खुप मोठे नुकसान झालेले आहे आणि अजुनही होत आहे, ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. कारण, पिढी घडायची असेल तर देशाची शैक्षणिक क्षेत्र चांगले असावे लागतेच.

या महामारीचा खरा फटका बसलाय तो २०१९-२० पासुन शिकत असणार्‍या सर्व विद्यार्थी मित्रांना. कारण, ‘प्रत्यक्ष शिक्षकांच्या पुढ्यात बसुण शिकणे आणि ऑनलाईन शिकणे खुप वेगवेगळ्या पद्धत्ती आहेत.   

करीयर म्हटले की आधी शिक्षण आले. त्यात नोकरी मिळवणे आजच्या पिढीला कठिण जात आहे. कारण नोकरी देणारेच ऑनलाईन शिक्षण आणि परिक्षा पद्धतीवर प्रश्नार्थक आहेत.

     यात आता खरा कस लागणार आहे तो या काळात आपले शिक्षण सम्पवुण बाहेर पडत असणार्‍या पिढीचा. २०१९-२० मध्ये महाविद्यालयीन शिक्षण सम्पवुन बाहेर पडलेली मुले पुर्णत: हवालदिल झालेली दिसत आहेत.

     करीयर साठी धडपडणारी ही मुले समजात आपले स्वतःचे स्थान नक्कीच मिळवू शकतात, फक्त या मुलांना समाज्याच्या अविश्वासू नजरेला सामोरे जावे लागणार. तो जर विश्वास जर या मुलांना मिळवायचा असेल तर आपली योग्यतासामर्थ्य आणि क्षमता प्रत्येक वेळी सिद्ध करावी लागेल.

     एक गोष्ट लक्षात असुद्या कि, तुमच्या वेळी जरी online शिक्षण पद्धत वापरली असली तरी तुम्हाला सगळा अभ्यासक्रम वेळेत शिकवला गेलाय. तुमच्यासाठी जमेची बाजु म्हणजे तुम्हाला समजुन घ्यायला आणि अभ्यास करायला भरपुर वेळ मिळाला. त्यामुळे शिकायचे कसे हे तुमच्याच हातात होत. तुमचा आत्मविश्वास हा तुमचा अभ्यास किती खोल आहे हे दाखवतो. आणि हिच बाब तुम्ही तुमच्या नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी निदर्शनास आणुन दिली पाहिजे. नोकरी साठी मुलाखत द्यायची म्हट्ली कि मनात भिती असते, खुप तयारी करावी लागते. मी तर सध्याच्या मुलांना असे सुचवेन कि, तुमच्याकडे स्मार्टफोन आहे आणि मित्र परिवार देखिल; मग ‘Video Call’ वर एकमेकांची मुलाखत घ्यायचा सराव करायला काय हरकत आहे. अस करुन मनातली भिती नक्की कमी होईल आणि आत्मविश्वास पण वाढेल.    

     आत्ता तुम्ही मुलांनीच स्वतःची क्षमता ओळखुन आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, मग मार्ग नक्किच सापडेल. माझ्यामते, सध्या आपल्या सगळ्यांकडे निवांत वेळ आहे. तर मग शांत बसुन एकदा स्वतःचा विचार करायला कोणी अडवलय? ‘आपण काय करु नाही शकत यावर विचार करुन वेळ फुकट घालवण्यापेक्षा, ‘आपण काय करु शकतो यावर विचार करा. तुम्ही स्वतःला आता जेवढे ओळखता तेवढे दुसरे तुम्हाला ओळखणार या जगात कोणीही नाही. स्वतःला पारखा. उत्तर सापडत नसेल तर प्रत्येक गोष्ट करुन पहा आणि नंतर निर्णयाला पोहोचा.

     एखाद ध्येय निश्चित करणे, खुप अवघड आहे. कारण ध्येय म्हणजे स्वप्न नव्हे. ध्येय हे साध्य करण्यासाठीच निश्चित केल जाते. आपण छोटी ध्येय निश्चित करुन ती पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा.

     एक दिवस निश्चित करा, त्या दिवसात तुम्ही काय करायचे ते आधी ठरवा. त्या दिवसाचे वेळापत्रक बनवा आणि स्वतःला अजमावुन बघा. जो एक दिवस तुम्ही ठरवलेला तो तुम्ही तसाच जगलात का किंवा त्या दिवसात ठरवलेली कामे तुम्हाला करता आली का? जर करता आली नसतील तर अजुनही प्रयत्न करायचे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही त्या एका दिवसात ठरवलेले काम पुर्णत्वास नेले असेल तर तुम्ही एक ध्येय निश्चित करु शकता. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा. थोडक्यात दिवसातील निदान १२ तासांचे तरी योग्य नियोजन आपल्याला करता यावे.

सरतेशेवटी एवढेच सांगेण कि, हा काळ लवकरच संपेल. आपण नेहमी आशावादी राहिले पाहिजे. स्वतःवरचा विश्वास कमी होवु देवु नका. जे शिक्षण तुम्ही घेतलय त्यातच तुमचे करीयर होईल असे सांगता येत नाही, पण उपयोग मात्र नक्की होतो. तुम्ही खुप काही गोष्टी करु शकता, त्याचा शोध घेत रहा, यश नक्कीच मिळेल.

धन्यवाद!

Comments

  1. सर खुप छान माहिती.......... कोरोना महामारीमत शैक्षणिक दृष्टीकोन कसा असावा हे समजले...........

    ReplyDelete
  2. Nice! Motivational article sir👍

    ReplyDelete
  3. खूप छान सर ; तुम्ही दिलेल्या वेळेच्या नियोजनाबद्दल माहिती खूप उपयोगी आहे 👍

    ReplyDelete
  4. Very helpful and motivational 👍

    ReplyDelete
  5. Very helpful and motivational article sir

    ReplyDelete
  6. Very Nice And Meaningful article sir

    ReplyDelete
  7. Video call वर मित्रमैत्रणींनी एकमेकांची मुलाखत घेणे ही कल्पना आवडली .

    ReplyDelete
  8. Very helpful...nice sir ..👌

    ReplyDelete
  9. खूप छान सर ; या कोरोना काळात आपण दिलेला सल्ला मोलाचा आहे .

    ReplyDelete
  10. खूप छान आर्टिकल सर... कोरोनाने आपल्याला भरपूर काही शिकवले।। विद्यार्थ्यांनी करिअर कशात करायचे आहे हे अगोदरच Planning करायला पाहिजे।

    ReplyDelete
  11. Very nice article sir 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

CONSIDERATION OF GHOSTS

कृष्ण विवरे (Blackholes)

Mystery of Bermuda Triangle