मन आणि मनाच्या श्रेणी
मन आणि मनाच्या श्रेणी ( टिप : माझा ब्लॉग हा पुर्णपणे माझ्या विचारांवर अवलंबून आहे. ते सर्वांना पटलेच पाहिजे यासाठी मी आग्रही नाही. ) मनाचे मुख्यत्वे चार श्रेणी पडतात. पहिली श्रेणी म्हणजे बुद्धी. बुद्धी कायम युक्तिवाद करत असते , प्रत्येक गोष्टी वर उपाय शोधत असते. विज्ञानाने जी काही क्रांती केलीय ती फक्त अनुमानानुसार आणि सध्याच्या युगात ‘ अनुमान ’ हेच एक अतिमहत्वाचे मानले जाते. भौतिक गोष्टी बाबतीत आपण अनुमान लावू शकतो पण आपल्या जीवनक्रमाच्या बाबतीत ते तेव्हढं निकाल मिळवून देईल असे वाटत नाही. बुद्धी असणे हे एक जिवंतपणाचे लक्षण आहे. बुद्धी हे एक अवजार आहे. बुद्धी तेव्हाच काम करते जेव्हा तिच्यासोबत स्मृती असते. समजा , तुमच्या स्मरणात असलेल्या गोष्टी काढून टाकल्या तर तुमची बुद्धी तीची कितीही क्षमता असली तरी काम करू शकणार नाही. तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी स्मृती नसेल तर आपण मुर्ख वाटू शकतो. शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना एकत्र बसवून एखाद्या गोष्टीची परीक्षा घ्यायची ठरवली तर शहरी विद्यार्थी हुशार वाटतो कारण त्याच्याकडे जास्त माहिती असते आणि सोबतचा ग्रामीण विद्यार्थी कमी हुश...