Today's Pandemic Situation and Students Career
कोरोनाचा काळ आणि मुलांचे करीयर नमस्कार मित्रहो , सध्या कोरोना सारख्या रोगाची साथ सुरु असताना , आपण स्वतःची तसेच घरातल्यांची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. सरकार आपल्यापरीने, ही साथ रोखण्यासाठी वैद्यकिय सेवे सोबत संचारबंदी , जमावबंदी आदि कायद्याने जमतील तसे सर्व प्रयत्न करत आहेच. या कोरोना महामारीणे खुप काही आपल्याला शिकवले. पर्यावरणाच्या द्रुष्टीने बघायचे झाले तर , वातावरणात प्रदुषण कमी होवु लागलय. निसर्ग पुन्हा बहरताना दिसतोय . माणसाचा गेलेला प्राण वगळता , आपण सर्व काही पुन्हा मिळवू शकतो. तरी देखील एक असे महत्त्वाचे क्षेत्र आहे ज्यामुळे समाजाचे खुप मोठे नुकसान झालेले आहे आणि अजुनही होत आहे , ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. कारण , पिढी घडायची असेल तर देशाची शैक्षणिक क्षेत्र चांगले असावे लागतेच. या महामारीचा खरा फटका बसलाय तो २०१९-२० पासुन शिकत असणार्या सर्व विद्यार्थी मित्रांना. कारण , ‘ प्रत्यक्ष शिक्षकांच्या पुढ्यात बसुण शिकणे ’ आणि ‘ ऑनलाईन शिकणे ’ खुप वेगवेगळ्या पद्धत्ती आहेत. करीयर म्हटले की आधी शिक्षण आले. त्यात नोकरी मिळवणे आजच्...