Posts

Showing posts from April, 2022

कृष्ण विवरे (Blackholes)

Image
  कृष्ण विवरे ( Blackholes )        आपण सर्वांनी Blackhole हे नाव ऐकले असेलच. Blackhole ही अवकाशातील अशी वस्तु आहे , ज्याची गुरूत्वाकर्षण शक्ती इतकी जास्त आहे कि प्रकाश देखील त्यापासून सुटू शकत नाही. थोडक्यात आजूबाजूला येणारी प्रत्येक गोष्ट ती गिळंकृत करते. Blackhole ही अशी जागा आहे जिथे भौतिकशास्त्राचे सर्व नियम कार्य करणे थांबवतात.       अवकाशात अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दलचे शोध माणसाला अजूनही लागलेले नाहीत. काही गोष्टींबद्दल शास्त्रज्ञ केवळ गृहीतकं मांडत असतात. कालांतराने या गृहीतकांची सत्यता सिद्ध होते आणि मग त्याला मान्यता मिळते. अशीच एक अलीकडच्या काळात मान्यता मिळालेली संकल्पना म्हणजे ब्लॅक होल !       ‘ ब्लॅक होल ’ ला ब्लॅक-होल म्हणण्याचे कारण म्हणजे त्याचा ‘ काळा ’ रंग. ब्लॅक होल मध्ये आपण पाहू शकत नाही , आपण फक्त त्याचे परिणाम (Effects or results) पाहू किंवा अनुभवू शकतो. ब्लॅक होलच्या सभोवतालच्या क्षेत्राचे विश्लेषण केल्याने आपण त्याचे वातावरणावर होणारे परिणाम पाहू शकतो . ब्लॅक होल म...