Posts

Showing posts from August, 2021

अध्यात्म

Image
       अध्यात्म           अध्यात्म हे जन्म आणि मृत्यू संबधित नसुन , अध्यात्म म्हणजे अशी गोष्ट निर्माण करणे जी मृत्यू पण आपल्याकडुन  हिरावुन घेऊ शकत नाही. अध्यात्मिक साधना मृत्यू पासुन वाचण्यासाठी म्हणजे मृत्यू येऊ नये यासाठी केली जात नाही किंवा करायची नसते , तर मृत्यू च्या कारणासाठी म्हणजे पुन्हा जन्म न येण्यासाठी केली जाते. थोडक्यात जन्म – मृत्यू च्या फेरीतुन सुटका मिळवण्यासाठी केली जाते.     अध्यात्मिक प्रक्रिया जिवन संदर्भात नसते तर शरीराचा जन्म आणि मृत्यु संदर्भात असते. म्हणजेच अध्यात्मिक प्रक्रिया आपल्या बाबतीत असते जिथे जन्म व मृत्यू दोन्ही नसतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर असं म्हणता येईल कि , अध्यात्मिक साधना करुन तुम्ही अशी गोष्ट प्राप्त करु शकता जी मृत्युपश्यात ही तुमच्याकडुन हिरावुन घेतली जाऊ शकणार नाही.     आपला जन्म या भुतलावर झाला , म्हणजे हे मानवी शरीर आपण ह्या पृथ्वी (धरती माता) कडुन घेतलेले कर्ज आहे. ज्याची मृत्यु वेळी आपल्याकडुन पुर्ण वसुली करुन घेतली जाते. परंतु जो पर्...