Mystery of Bermuda Triangle
बर्मुडा त्रिभुज (त्रिकोण) बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा , पोर्तोरिको आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडून बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोण आकाराचा समुद्र प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९ , ०० , ००० चौ.किमी आहे. या त्रिकोणाविषयी अनेक गैरसमज आहेत. कारण या समुद्री प्रदेशात प्रवास करत असताना अनेक जहाजे आणि विमाने आकस्मिकरित्या बुडाली आहेत. म्हणुनच अनेक तर्क वितर्क लावले गेलेत. जसे कि भौतिक शास्त्राच्या नियमाविरुद्ध घटना घडणारा प्रदेश ; कृष्णविवरे ( black holes ) असलेला प्रदेश ; अनेक दुर्घटनांना अवकाशातील घटक कारणीभुत असल्याचाही समज आहे. संशोधनात असं समोर आले आहे की , मुख्य करुन अपघाताचे कारण हे होकायंत्रातील बदल हे होय. { क्षितिज समांतर टांगलेली चुंबकसुची , पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर – द्क्षिण दिशेने स्थिर होते . चुंबकसुची वापरुन दिशा ओळखण्यासाठी बनवलेल्या उपकरणास होक...